जिवाला जीव देणारी जिवाजी महाले || Jivaji Mahale who would lay down his life for his dear one

WhatsApp Image 2026 10 15 at 9.20.07 PM

जीवाला जीव देणारे जिवाजी घडावेत!- शिवश्री ज्ञानेश्वर खटींग

ताडकळस येथे छत्रपती शिवरायांचे विश्वासू अंगरक्षक नरवीर जिवाजी महाले यांची जयंती उत्साहात साजरी.

Jivaji Mahale, who would lay down his life for his dear one

ताडकळस दि.१२ ऑक्टोबर – छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात बलिदान देण्यासाठी मावळ्यांमध्ये स्पर्धा असायची. एवढा विश्वास छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये आणि रयतेमध्ये निर्माण केला होता. तो विश्वास आता हरपला आहे. सध्याच्या राज्यकर्त्यांमध्ये मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी एकमेकांच्या मानगुटीवर पाय देऊन पुढे जाण्याची पाताळ यंत्री स्पर्धा निर्माण झाली आहे.

आता पुन्हा नव्याने जीवाला जीव देणारे जिवाजी घडले पाहिजेत! तसेच तरुणांमध्ये निर्माण झालेली बेरोजगारी, शिक्षण आणि नोकरीमध्ये निर्माण झालेला गोंधळ यामुळे तरुणाई बिथरली असल्याचे शिवश्री ज्ञानेश्वर खटिंग यांनी प्रतिपादित केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक जिवाजी महाले यांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.Jivaji Mahale who would lay down his life for his dear one

Jivaji Mahale who would lay down his life for his dear one 1

जिवाजी महाले आणि आजचा युवक

पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील जयंत दाळमिल येथे “शिवचरित्रातील जिवाजी महाले आणि आजचा तरुण” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, ताडकळस कृ.उ.बा.समितीचे सभापती श्री बालाजी रुद्रवार, सरपंच श्री गजानन आंबोरे , प्रमुख पाहुणे म्हणून स.पो.नि. श्री श्रीधर जगताप, जि प सदस्य श्री संजय जल्हारे, बारा बलुतेदार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री भालचंद्र गोरे, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री ऋषिकेश सकनुर, सामाजिक कार्यकर्ते संभाजीराव भोसले, श्री लक्ष्मणराव शिंदे,

श्री शिवाजीराव आंबोरे, श्री बाळासाहेब कापसे, श्री अशोकराव शिराळे, श्री गजानन कामाजीराव आंबोरे, ग्रा.पं.स. श्री सुरेश मगरे, श्री दीपकनाना आंबोरे, क्रांतीशास्त्रचे संपादक धम्मपाल हनवते, कृष्णकांत दुधाटे, श्री कुरे सर, श्री शेख खय्युम शेख लायक अली, आबासाहेब बनसोडे, उत्तमनाना आंबोरे आदींसह पंचक्रोशीतील मान्यवरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.Jivaji Mahale who would lay down his life for his dear one

याप्रसंगी सपोनी श्री श्रीधर जगताप यांनी “शूरवीरांच्या प्रेरणादायी इतिहासाने तरुणांमध्ये आदर्श निर्माण होतो. आणि अशा व्याख्यानांच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून सामाजिक सलोखा अधिक दृढ होत जातो, असे प्रतिपादन करून महान योध्दे जिवाजी महाले यांच्या जीवन कार्यावर त्यांनी थोडक्यात प्रकाश टाकला. अशा प्रकारच्या प्रबोधनांच्या कार्यक्रमाची गरज प्रतिपादन करून त्यांनी ह्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.

Jivaji Mahale who would lay down his life for his dear one 2

प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती

प्रमुख पाहुणे श्री भालचंद्र गोरे यांनी “शिवरत्न जिवाजी महाले” यांनी हिंदवी स्वराज्यात महत्त्वाचे योगदान दिले आणि समाजाला कर्तृत्वाचा वारसा दिला. समाजातील बदलती स्थित्यंतरे पाहता सध्याच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळामध्ये तरुणांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कर्तृत्व दाखवण्याची संधी निर्माण झाली आहे. तसेच बारा बलुतेदारांनी हा महाराष्ट्र घडविण्यात मोलाची भूमिका बजावली असल्यामुळे त्यांनी आधुनिक काळात आपल्या व्यवसायाला तंत्रज्ञानाची जोड द्यावी असे म्हणत त्यांनी सामाजिक वाटचालीवर प्रकाश टाकला.Jivaji Mahale who would lay down his life for his dear one

Jivaji Mahale who would lay down his life for his dear one 3

अध्यक्षीय भाषणाने समारोप

यावेळी श्री बालाजी रुद्रवार यांनी अध्यक्षीय समारोप केला. हिंदवी स्वराज्यातील प्रामाणिक आणि निष्ठावान अंगरक्षक जिवाजी महाले यांच्यासारख्या कर्तृत्ववान मावळ्यांचा इतिहास मोठ्या प्रमाणात जगासमोर येणे गरजेचे आहे. त्यामुळे समाजाला प्रेरणा मिळू शकते. असे प्रतिपादन करून या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.Jivaji Mahale who would lay down his life for his dear one
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव श्री साहेब शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन मराठा सेवा संघाचे पूर्णा तालुकाधक्ष श्री प्रमोद आं
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव श्री साहेब शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन मराठा सेवा संघाचे पूर्णा तालुकाधक्ष श्री प्रमोद आंबोरे यांनी केले तर श्री बाबुराव भालेराव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Jivaji Mahale who would lay down his life for his dear one 4

कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालासाहेब गंगात्रे, मल्लिकार्जुन भालेराव, तुकाराम भवरे, विनोद आंबोरे, गयबी भालेराव, हरीभाऊ गंगात्रे, विलास भालेराव, गजानन भालेराव, राजू भालेराव, वैष्णव भालेराव, संतोष गंगात्रे, सुरज सूर्यवंशी, लिंबाजी भालेराव व समस्त नाभिक समाज बांधव यांनी प्रयत्न केले.Jivaji Mahale who would lay down his life for his dear one

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top