जिवाजी महाले स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही || Jiwaji Mahale will not allow funds to run short for the memorial

Jiwaji Mahale will not allow funds to run short for the memorial 1

किल्ले प्रतापगडावर शूरवीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार; निधीची कमतरता भासू देणार नाही – पालकमंत्री शंभूराज देसाई Jiwaji Mahale will not allow funds to run short for the memorial

Jiwaji Mahale will not allow funds to run short for the memorial

स्वाभिमानी नाभिक संघटनेच्या पाठपुराव्याला यश; राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव

प्रतापगड : किल्ले प्रतापगडावर शूरवीर “जिवाजी महाले” यांचे भव्यदिव्य स्मारक उभारण्याचे भाग्य पर्यटन मंत्री म्हणून मला लाभले, ही अभिमानाची बाब आहे. या स्मारकासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे “पालकमंत्री शंभूराज देसाई” यांनी दिली.शुरवीर “जिवाजी महाले” उत्सव समिती किल्ले प्रतापगड व स्वाभिमानी नाभिक समाज संघटनेच्या वतीने आयोजित शूरवीर जिवाजी महाले जयंती उत्सव निमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.Jiwaji Mahale will not allow funds to run short for the memorial

Jiwaji Mahale will not allow funds to run short for the memorial 2

जिवाजी महाले स्मारक समिती

शूरवीर जिवाजी महाले उत्सव समिती, किल्ले प्रतापगड, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे, शूरवीर जिवाजी महाले उत्सव समिती किल्ले प्रतापगड समितीचे संस्थापक अध्यक्ष व संघटनेचे संस्थापक राज्याध्यक्ष समाजभूषण शंकरराव गायकवाड, समितीचे उपाध्यक्ष अधिक चव्हाण, समितीचे सचिव नारायण यादव, समितीचे खजिनदार प्रदीप काशीद, सचिव नारायण यादव जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले. Jiwaji Mahale will not allow funds to run short for the memorial
महिला आघाडीच्या अनिता काशीद, समितीचे शिवाजी खामकर, विजय काशीद, जगन्नाथ पवार, विष्णू सपकाळ, संग्राम माने, दाजी सुर्वे, अमोल काशीद, सुनील जाधव नितीन पवार विनायक भोसले विक्रम महिपाल बाळासाहेब ढवळे संकेत निकम बाबुराव पवार पांडुरंग चव्हाण, संग्राम झेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

सातारा पालकमंत्री काय म्हणाले?

यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, शूरवीर जिवाजी महाले यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी केलेला पराक्रम इतिहासात अजरामर आहे. अशा महान योद्ध्याचे स्मारक किल्ले प्रतापगडावर उभारणे ही गौरवाची बाब आहे. “स्वाभिमानी नाभिक संघटनेने” या स्मारकासाठी सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा केला. या पाठपुराव्याची दखल घेत मंत्रालयात झालेल्या बैठकीत स्मारकासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यापुढेही संघटनेने समाजहिताची कामे माझ्याकडे आणावीत. ती मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही त्यांनी दिली. Jiwaji Mahale will not allow funds to run short for the memorial

Jiwaji Mahale will not allow funds to run short for the memorial 3

जिवाजी महाले पराक्रम प्रेरणादायी

शूरवीर जिवाजी महाले यांचा पराक्रम नव्या पिढीसाठी प्रेरणादायी – आमदार मनोज घोरपडे

आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या रक्षणासाठी शूरवीर जिवाजी महाले यांनी दाखविलेली समयसूचकता, धाडस आणि पराक्रम अतुलनीय होता. अफजलखान भेटीच्या प्रसंगी सय्यद बंडाचा वार निष्प्रभ करून त्यांनी स्वराज्यावर आलेले संकट परतवून लावण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अशा पराक्रमी योद्ध्याच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करणे ही प्रेरणादायी बाब असून, या माध्यमातून त्यांच्या शौर्याची आणि इतिहासाची आठवण नव्या पिढीपर्यंत पोहोचेल, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. Jiwaji Mahale will not allow funds to run short for the memorial

२००७ पासूनच्या पाठपुराव्याला यश – शंकरराव गायकवाड

प्रास्ताविक भाषणात संघटनेचे संस्थापक राज्याध्यक्ष शंकरराव गायकवाड म्हणाले की, सन २००७ पासून शूरवीर जिवाजी महाले यांच्या स्मारकासाठी संघटनेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. या प्रयत्नांना आता यश मिळत असून, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी नाभिक समाजाच्या भावनांचा आदर राखला आहे. हा निर्णय समाजासाठी अभिमानास्पद असून, समाज त्यांच्या या सहकार्याची निश्चितच नोंद ठेवेल. Jiwaji Mahale will not allow funds to run short for the memorial

Jiwaji Mahale will not allow funds to run short for the memorial 4

राज्यस्तरीय पुरस्कार वितरण

शूरवीर जिवाजी महाले उत्सव समितीच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. समाजासाठी तसेच आपल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याची संधी मिळणे ही अभिमानाची बाब असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले. २०२६ च्या राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा गौरव Jiwaji Mahale will not allow funds to run short for the memorial
या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पुढील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
आदर्श माता पुरस्कार : श्रीमती मंगलताई भीमराव घोरपडे, मत्यापूर, ता. जि. सातारा.

  • समाजरत्न पुरस्कार : श्री. शशिकांत महादेव कदम, साखरी, ता. पाटण, जि. सातारा.
  • आदर्श उद्योजक पुरस्कार : श्री. मदनभाऊ निवृत्ती काळभोर, पाल, ता. कराड, जि. सातारा.
  • आदर्श शैक्षणिक पुरस्कार : सौ. संगीता अरुण बघवार, मसूर, ता. कराड, जि. सातारा.
  • उद्योजक रत्न पुरस्कार : श्री. जयवंत रामचंद्र कुंभार, काशील, जि. सातारा.
  •  उत्कृष्ट क्रीडा पुरस्कार : श्री. विक्रमसिंह लक्ष्मण घाडगे, मिलिटरी अपशिंगे, जि. सातारा.
  • आदर्श ग्रामसेविका पुरस्कार : सौ. प्रियंका अभिजीत चव्हाण, महागाव, जि. सातारा.
  • उद्योजक पुरस्कार : श्री. काशिनाथ महादेव पाटील, मल्हारपेठ, ता. कराड, जि. सातारा.
  • मनी ग्रोथ कोच पुरस्कार : श्री. अविनाश केशव निकम, शिवाजीनगर, पुणे. याना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले
    हलगीच्या निनादात प्रतापगडावर शौर्याचा जयघोष

स्वाभिमानी नाभिक संघटना

शूरवीर जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त स्वाभिमानी नाभिक संघटनेच्या वतीने सातारा जिल्ह्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने कार्यकर्ते, महिला, पुरुष आणि शिवप्रेमी सहभागी झाले होते. सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर सर्वजण किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी दाखल झाले. Jiwaji Mahale will not allow funds to run short for the memorial

तेथे शूरवीर जिवाजी महाले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुष्पवृष्टीद्वारे अभिवादन करण्यात आले. हलगीच्या निनादात आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘शूरवीर जिवाजी महाले की जय’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर रॅली कार्यक्रमस्थळी पोहोचली. हलगीचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीमुळे उत्सवात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमात पालकमंत्री शंभूराज देसाई आणि आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. यावेळी संघटनेचे राज्य, पश्चिम महाराष्ट्र, जिल्हा आणि तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्य तसेच जिल्ह्यातील विविध भागातून नाभिक समाज बांधव माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.Jiwaji Mahale will not allow funds to run short for the memorial

शूरवीर जिवाजी महाले यांच्या स्मारकासाठीचा दीर्घकालीन पाठपुरावा, जयंती उत्सवातील उत्स्फूर्त सहभाग आणि विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव यामुळे हा सोहळा ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्वाचा ठरला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top