Nabhik Samaj Dimand
छत्रपती संभाजीनगर :- नाभिक समाजाच्या वतीने 30 सप्टेंबर रोजी आझाद मैदान , मुंबई येथे धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून पाच हजार पेक्षा जास्त नाभिक समाज बांधव आझाद मैदानावर येणार आहे. सकल नाभिक समाजाच्या वतीने तसे सरकारला निवेदन देण्यात आले आहे.Nabhik Samaj Dimand
हे आंदोलन सामाजिक कार्यकर्ते किरणजी भांगे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. तत्पूर्वी महाराष्ट्र राज्याचे “इतर मागास बहुजन कल्याण मंत्री मा श्री अतुलजी सावे” यांनी आंदोलन कर्ते किरणजी भांगे यांच्याशी छत्रपती संभाजीनगर येथे चर्चा केली. व असे सांगितले की नाभिक समाजाच्या मागण्या संदर्भात सरकार सकारात्मक असून मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांच्या सोबत दिनांक 20, 21 सप्टेबर रोजी बैठक होणार आहे.
त्या बैठकीत नाभिक समाजाच्या मागण्यावर पूर्णपणे विचार केला जाईल. असे आश्वासन “इतर मागास बहुजन कल्याण मंत्री मा श्री अतुलजी सावे” यांनी दिले आहे. यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या महिला प्रदेशाध्यक्ष सौ भारतीताई सोनवणे तसेच नाभिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री माधव भाले यांची विशेष उपस्थिती होती.Nabhik Samaj Dimand
नाभिक समाजाच्या मागण्या
- संत सेनाजी महाराज के शिल्पी महामंडळाच्या लेटर पॅडवर, कार्यालय योजना माहितीपत्रके यांच्यावर संत सेना महाराज यांचा मूळ फोटो (सिंहासनावर बसलेला) वापरावा.
- संत सेनाजी महाराज केश शिल्पी कर्ज योजनेतील जामीनदाराची आणि सिबील स्कोर अट शिथिल करण्यात यावी.
- संत सेनाजी महाराज केश सिल्पी महामंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांची नाभिक समाजातून निवड करण्यात यावी.
- मंजूर निधी पैकी 50% निधीचा विनियोग कर्ज प्रकरणे आणि 50 % निधीचा विनियोग बांधकाम व इतर इमारत कामगार मंडळाच्या धर्तीवर विविध अनुदानित योजनाच्या स्वरूपात करावा.Nabhik Samaj Dimand
- संत सेनाजी महाराज यांची जयंती (चैत्र कृष्ण- 12) शासन स्तरावर साजरी करावी.
- नाभिक समाजाची टिंगल टवाळी थांबण्यासाठी इतर राज्याप्रमाणे कडक कायदा करावा.
- ओबीसी आरक्षणात होत असलेली बोगस घुसखोरी तात्काळ थांबवावी.
- प्रतापगड येथील जिवाजी महाले यांचे स्मारकाचे काम तात्काळ सुरू करावे.
30 सप्टेंबरला मुंबईत आंदोलन
नाभिक समाजातील सामाजिक कार्यकर्ते किरण भांगे यांनी उपरोक्त मागण्याचा सरकारने सकारात्मक विचार न केल्यास 30 सप्टेंबर रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमधून नाभिक समाज मुंबई येथील आझाद मैदानावर येणार आहे या समाजाची एकूण संख्या पाच ते दहा हजार असणार आहे. असे सामाजिक कार्यकर्ते किरण भांगे यांनी सांगितले आहे.Nabhik Samaj Dimand