ओबीसी प्राध्यापकावरील बडतर्फी मागे घ्या || Withdraw dismissal of OBC professor

Withdraw dismissal of OBC professor1

Withdraw dismissal of OBC professor

प्रा. डॉ. सुरेश घुमटकर या ओबीसी प्राध्यापकावरील बडतर्फी मागे घ्या.मोठ्या संख्येने ओबीसी बांधवाचे निवेदन व लवकरच तीव्र आंदोलन .Withdraw dismissal of OBC professor

प्रा सुरेश घुमटकरांना तुरुंगवास

छत्रपती संभाजीनगर:- मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे विनायकराव पाटील महाविद्यालय वैजापूर, येथे अर्थशास्त्र विभागप्रमुख म्हणून कार्यरत ओबीसी समाजाचे  प्रा. “डॉ. सुरेश घुमटकर” यांच्या एका फेसबुक पोस्टचा आधार घेत केलेली जातीय द्वेषभावनेतून केलेली बडतर्फीची कार्रवाई तात्काळ मागे घ्यावी.

ओबीसी वर होत असलेला अन्याय त्वरीत थांबवावा अशी मागणी “मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळास”, शिक्षण उपसंचालक उच्च शिक्षण, कुलगुरु डॉ. बा. आंबेडकर विद्यापीठ यांना भारतीय पिछडा शोषित संघटनासह अन्य संघटनेच्या दिलेल्या निवेदनात आहे. बीड येथील फिर्यादी महेश धांडे यांच्या बनावट फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाणे, बीड येथे आयपीसी 295 A आणि 505(2 )अशा बनावट खोटे गुन्हे दाखल केले.Withdraw dismissal of OBC professor

सदरील गुन्ह्यात अटकेची गरज नसताना सुद्धा फिर्यादीने दबावतंत्राचा वापर करुन एफआयआर दाखल केला आणि लॉकअप मध्ये ठेवले. दुसऱ्यादिवशी बीड जिल्हा सत्र न्यायालयातून २ दिवसांचा PCR मंजूर करून पोलीस कोठडीत प्रा. सुरेश घुमटकर यांना मानसिक, शारीरिक त्रास देऊन त्यांची आर्थिक लूट केली.

ओबीसी प्राध्यापका बद्दल अधिक माहितीसाठी

 खाली क्लिक करा

   image 2

click here

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी सरचिटणीस, आमदार सतीश चव्हाण, अध्यक्ष, आमदार प्रकाश सोळंके, संस्थेचे उपाध्यक्ष अमरसिंह पंडित इत्यादिंनी संचालकांनी सदरील गुन्ह्याची सत्यता न पडताळता केवळ पोलीस कोठडीच्या आधार घेत 18 सप्टेंबर 2023 रोजी प्रा. डॉ. सुरेश घुमटकर यांना सेवेतून निलंबित केले.

सदरील जातीवादी संस्थाचालक एवढ्यावरच न थांबता सदरील प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना जातीयवादी मानसिकतेतून मंडळाच्या संचालकांनी पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनातून एकतर्फी चौकशी करून गुन्हा सिद्ध होतो असे गृहीत मानून चुकीचा आणि खोटा अहवाल तयार करून 15 फेब्रुवारी 2024 पासून प्रा. डॉ.सुरेश घुमटकर यांना प्राध्यापक या पदावरून बडतर्फ केले आहे.Withdraw dismissal of OBC professor

सदरील घटना महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय निंदनीय व निषेधार्ह असून ती पुरोगामी महाराष्ट्राला व शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी आहे आणि समस्त महाराष्ट्रातील ओबीसी समाजावर अन्याय करणारी असल्याने ओबीसींमध्ये तीव्र असंतोष पसरल्याची भावना निवेदन दिल्यानंतर ओबीसी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. सदरील घटनेचा अतिशय तीव्र शब्दात ओबीसींनी जाहिर निषेध व्यक्त केला.

बडतर्फी तात्काळ रद्द करा

प्रा डॉ. सुरेश घुमटकर यांच्यावर बडतर्फीची केलेली बेकायदेशीर कारवाई तात्काळ रद्द करून डॉ. सुरेश घुमटकर सरांना पूर्ववत विनाअट सेवेत सामावून घेण्यात यावे. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळावर तात्काळ शासकीय प्रशासकाची नेमणूक करून संस्थेमध्ये होत असलेल्या मागासवर्गीय शिक्षक- प्राध्यापक-शिक्षकेत्तर यांच्यावरील अन्याय तात्काळ थांबवा. Withdraw dismissal of OBC professor

प्राध्यापक डॉ. सुरेश घुमटकर यांच्या कुटुंबियांच्या जीवाला या संस्थाचालकांकडून धोका असून कुटुंबाला तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे. अशा भावना ओबीसी निवेदन देतांना व्यक्त केला.‌ जर लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर लवकरच तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही याप्रसंगी दिला.

ओबीसी संघटनेचे पदाधिकारी

याप्रसंगी डॉ. कालिदास भांगे, डॉ वसंत हारकळ, प्रभाकर गायकवाड, परमेश्वर बटुले ,माधव भाले,योगेश हेकडे, निशांत पवार, साईनाथ जाधव, अमोल वाघमारे, रमाकांत तिडके, देवराज दराडे, लक्ष्मण कडक,अर्जुन सोनवणे,हनुमान वांकर, अभिषेक तावडे, राधेश्याम सुरवसे, ससाणे आर ए, सागर सूंदर,माधव भाले, डोंगरे, असंख्य ओबीसी कार्यकर्ते उपस्थित होते.Withdraw dismissal of OBC professor

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top