2023-24 च्या अर्थसंकल्पात नाभिक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्राचे अर्थमंत्री मा श्री देवेंद्र फडणवीस यांनी “संत सेनाजी महाराज केसशिल्पी महामंडळाची” घोषणा करून या महामंडळास भरीव आर्थिक तरतूद करण्याची घोषणा केली.
नाभिक समाजातील विविध संघटनेच्या वतीने सरकारचे अभिनंदन करण्यात आले असले तरी आता संत सेनाजी महाराज “केसशिल्पी महामंडळाच्या अध्यक्षपदी” कोणाची निवड होणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.Who is the President of Kesashilpi Corporation?
नाभिक समाजाचा व्यक्तीच अध्यक्षपदी आसावा
संत सेनाजी महाराज केसशिल्पी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होणारा व्यक्ती हा नाभिक समाजातील आसावा अशी महाराष्ट्रातील “सकल नाभिक समाजातून” मत व्यक्त केले जात आहे.कारण
नाभिक समाजाच्या व्यक्तीला नाभिक समाजाच्या प्रश्नांची जाणीव आसते,नाभिक समाजाच्या मागण्यात तो जातिने लक्ष घालू शकतो.कोरोणासारख्या परिस्थितीत महाराष्ट्रातील सलून चालकांची खूप हाल झाले.
34 सलून चालकांनी आत्महत्या केल्या त्यांना आर्थिक सहकार्य तर मिळाले नाही पण साधी त्यांची चौकशी पण केली नाही.तत्कालीन सरकारने सलून चालकांची दाखल घेतली नाही.Who is the President of Kesashilpi Corporation?
त्यामुळे “केसशिल्पी महामंडळाच्या अध्यक्षपदी नाभिक समाजाचा व्यक्ती आसावा.त्या व्यक्तीच्या पाठीशी नाभिक समाज आसतो.या सर्व गोष्टींचा नाभिक समाजाला व संबंधित सरकारला सुद्धा फायदा होतो.म्हणून “संत सेनाजी महाराज केसशिल्पी महामंडळाच्या अध्यक्षपदी” नाभिक समाजाचा व्यक्ती आसावा अशी महाराष्ट्रातील सकल नाभिक समाजाची इच्छा /मानसिकता आहे.
सेना भाजपचा पदाधिकारी केसशिल्पी महामंडळाच्या अध्यक्षपदी
संत सेनाजी महाराज केसशिल्पी महामंडळाच्या अध्यक्षपदी राजकीय दृष्टीने विचार केला तर एक गोष्ट स्पष्ट होते की या महामंडळाच्या अध्यक्षपदी
- शिवसेना – शिंदे गट किंवा
- भाजपचा पदाधिकारी
यांचीच वर्णी लागणार.कारण संत सेनाजी महाराज केसशिल्पी महामंडळ शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्या सरकारने दिले आहे.Who is the President of Kesashilpi Corporation?
म्हणून नाभिक समाजाचे जे नेते इतर पक्षात काम करतात त्यांना संत सेनाजी महाराज केसशिल्पी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागणार नाही.हे १००% खरे आहे.त्यातही भारतीय जनता पक्षाचा नाभिक समाजाचा पदाधिकारी अध्यक्षपदी निवड होणार हेही १००% खरं आहे.
नाभिक समाजातील या संघटना सक्रिय
- महाराष्ट्र नाभिक महामंडळ
- राष्ट्रीय जनसेवा पक्ष
- राष्ट्रीय नाभिक संघटना
- नाभिक सेवा संघ महाराष्ट्र
- राष्ट्रीय नाभिक एकता महासंघ
अधिक माहितीसाठी
👉 येथे क्लिक करा 👈
संत सेनाजी महाराज केसशिल्पी महामंडळाच्या अध्यक्षपदी नाभिक समाजाच्या व्यक्तीची निवड झाली पाहिजे.यासाठी नाभिक समाजाच्या पुढील संघटनेच्या वतीने हालचाली चालू आहेत.Who is the President of Kesashilpi Corporation?
महाराष्ट्र नाभिक महामंडळ
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात संत सेनाजी महाराज केसशिल्पी महामंडळाची घोषणा होताच, महाराष्ट्र नाभिक महामंडळाची मा श्री दत्ताशेट अनारसे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील कार्यालयात महत्वपूर्ण बैठक आयोजित करून पुढील दिशा ठरवून केसशिल्पी महामंडळाचा समाजाला जास्तीत जास्त फायदा कसा घेता येईल यावर चर्चा झाली.
विभागीय मराठवाडा अध्यक्ष श्री विष्णूजी वखरे यांनी सांगितले की महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने “मा.श्री.सुधीर (बंडू) राऊत” यांना संत सेनाजी महाराज केसशिल्पी महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड करावी यासाठी मुंबई येथे बैठकीत ठराव घेण्यात आला.
राष्ट्रीय जनसेवा पक्षाच्या वतीने आभार
नाभिक समाजासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ आसावे यासाठी राष्ट्रीय जनसेवा पक्षाच्या शिष्टमंडळाने मा श्री संजय पंडित यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे बहुजन समाज कल्याण मंत्री मा श्री अतूलजी सावे यांची भेट घेऊन अर्थसंकल्पापुर्वी निवेदन दिले होते.
अर्थसंकल्पात संत सेनाजी महाराज केसशिल्पी महामंडळासाठी आर्थिक तरतूद ची घोषणा केल्यानंतर पुन्हा मा श्री संजय पंडित यांनी बहुजन विकासमंत्री मा श्री अतूलजी सावे यांना संत शिरोमणी सेनाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन पेडे वाटप केले.Who is the President of Kesashilpi Corporation?
राष्ट्रीय नाभिक संघटनेच्या वतीने आभार
आज दिनांक 25 /3 /2023 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस साहेब यांनी उन्हाळी अधिवेशनामध्ये नाभिक समाजासाठी श्री संत सेना महाराज केश शिल्पी आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्याबद्दल राष्ट्रीय नाभिक संघटनेतर्फे आनंद उत्सव बाईक रॅलीचे आयोजन राजनोली नाका ते केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल जी पाटील साहेब यांच्या निवासस्थानापर्यंत करण्यात आले होते.
तसेच महामंडळाची स्थापना केल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिलजी पाटील साहेब यांचे नाभिक समाजातर्फे सन्मान व सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
व श्री महेंद्र अरुण जाधव यांची श्री संत सेना महाराज केश शिल्पी महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात यावी अशी मागणी ठाणे व पालघर जिल्ह्यातील सर्व नाभिक समाजातर्फे करण्यात आली करण्यात आली.यावेळी रॅलीमध्ये जवळजवळ 300 ते 400 लोकांनी सहभाग घेतला होता.Who is the President of Kesashilpi Corporation?
नाभिक सेवा संघ महाराष्ट्र
नाभिक समाजासाठी केसशिल्पी महामंडळास आर्थिक तरतूद करण्यात यावी यासाठी नाभिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष -श्री माधव भाले यांनी अर्थसंकल्पापुर्वी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जनतेतून सुचना पाठवण्यासाठी एक ऑनलाईन अभियान राबविले होते.
या अभियानाच्या माध्यमातून नाभिक समाजाच्या केसशिल्पी महामंडळास एक हजार कोटी ची तरतूद करण्यात यावी.अशी दहा हजार नाभिक बांधवांनी सुचना पाठवल्या होत्या.या केसशिल्पी महामंडळात खारीचा वाटा नाभिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष -श्री माधव भाले यांनी सांगितले.
राष्ट्रीय नाभिक एकता महासंघ
महाराष्ट्राच्या 2023-24 च्या अर्थसंकल्पात नाभिक समाजाच्या केसशिल्पी महामंडळास आर्थिक तरतूद जाहीर करावी यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री भगवानराव बिडवे यांनी शासकीय स्तरावर पाठपुरावा केला होता.
अधिक माहितीसाठी
👉 येथे क्लिक करा 👈
अर्थसंकल्पात घोषणेनंतर राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री भगवानराव बिडवे यांनी महाराष्ट्र सरकारचे आभार मानले होते.Who is the President of Kesashilpi Corporation?
मा श्री सुधीर (बंडू) राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली
अर्थसंकल्पात संत सेनाजी महाराज केसशिल्पी महामंडळास आर्थिक तरतूद करण्यात येईल अशी घोषणा महाराष्ट्राचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर केसशिल्पी महामंडळाची कार्यवाही,तातडीने अंमलबजावणी करावी.
यासाठी नागपूर चे महानगरपालिकेचे मा सभापती तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले मा श्री सुधीर (बंडू) राऊत भेट घेऊन तात्काळ कार्यान्वित करावे आसी सुचनावजा आठवण करून दिली.Who is the President of Kesashilpi Corporation?
सलोन ब्युटी पार्लर चे उदय टक्के
संत सेनाजी महाराज केसशिल्पी महामंडळाच्या अध्यक्षपदी सलून ब्युटी पार्लर चा व्यवसाय करणार्या समाजाची पुर्ण जानिव असलेली व्यक्ती अध्यक्षपदी असावी अशी भूमिका नाभिक समाजाचे अंतराष्ट्रीय ख्यातीचे हेअर आर्टिस्ट मा श्री उदय टक्के यांनी जाहीर केले आहे.
म्हणजे योग्य व्यक्तीची निवड केसशिल्पी महामंडळाच्या अध्यक्षपदी व्हावी अशी इच्छा मा श्री उदय टक्के यांची आहे.कोरोनाकाळात सलून चालकांना बरेच सहकार्य उदय टक्के यांनी केले होते.Who is the President of Kesashilpi Corporation?
मा श्री सुधीर (बंडू) राऊत होऊ शकतात केसशिल्पी महामंडळाचे अध्यक्ष
वरील सर्व गोष्टीचा अभ्यास केला असता एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे संत सेनाजी महाराज केसशिल्पी महामंडळाच्या अध्यक्षपदी सामाजिक आणि राजकीय दृष्टीने विचार केला असता.Who is the President of Kesashilpi Corporation?
सर्व पात्रता नाभिक समाजाचे नेते, भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ लोकप्रतिनिधी, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले मा श्री सुधीर (बंडू) राऊत हेच केसशिल्पी महामंडळाचे अध्यक्ष होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.Who is the President of Kesashilpi Corporation?