नाशिक कुंभमेळा ध्वजारोहण नाभिक समाजाच्या हस्ते || Nashik Kumbh Mela flag hoisting by the Nabhik Samaj

Nashik Kumbh Mela flag hoisting by the Nabhik Samaj 1

नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळा चे ध्वजारोहण नाभिक समाजाच्या प्रतिनिधी हस्ते करण्यात आले त्याबद्दल या पोस्ट मध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे.आवडल्यास इतरांना जरुर पाठवा. Nashik Kumbh Mela flag hoisting by the Nabhik Samaj

Nashik Kumbh Mela flag hoisting by the Nabhik Samaj

कुंभमेळा हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि जगातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक आहे. भारतात प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा भरतो.

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे. गोदावरी नदीच्या पवित्र तीरावर लाखो भाविक स्नान, पूजा-अर्चा, साधुसंतांचे दर्शन आणि धार्मिक विधी करण्यासाठी एकत्र येतात.Nashik Kumbh Mela flag hoisting by the Nabhik Samaj

कुंभमेळा हा श्रद्धा, भक्ती, संस्कृती, परंपरा आणि भारतीय एकतेचे प्रतीक आहे.2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याची सुरवात 31 आक्टोंबर 2026 रोजी विविध मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून सुरुवात झाली.या ध्वजारोहणासाठी नाशिक येथील नाभिक समाजाचे दोन प्रतिनिधी विशेष आमंत्रित होते. त्यांना परंपरेने ध्वजारोहण करण्याचा मान देण्यात आला.

Nashik Kumbh Mela flag hoisting by the Nabhik Samaj 2

कुशावर्त तीर्थावर ध्वजारोहण

नाशिक त्रंबकेश्वर येथील श्री कुशावर्त तीर्थावर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धर्म ध्वजारोहण सोहळ्यात पारंपारिक मानाचा यंदाही सन्मान राखण्यात आला. कुशावर्त तीर्थावरील ध्वजारोहणाचा परंपरागत अधिकार असलेल्या गणेश मोरे आणि निलेश मोरे यांच्या हस्ते ध्वजाची दोरी ओढून धर्म ध्वजारोहण करण्यात आले. शेकडो वर्षाची परंपरा जपत मोरे कुटुंबाने पुन्हा एकदा या ऐतिहासिक धार्मिक सोहळ्यात मानाचे स्थान पटकावले.Nashik Kumbh Mela flag hoisting by the Nabhik Samaj

Nashik Kumbh Mela flag hoisting by the Nabhik Samaj 3

विविध मान्यवरांची उपस्थिती

नाशिक येथील कुशावर्त तीर्थावर सिंहस्थ कुंभमेळ्याचा विधी व धर्म ध्वजारोहण सोहळा शनिवारी 31 ऑक्टोबर 2026 रोजी धार्मिक वातावरणात पार पडला दुपारी बारा वाजून दोन मिनिटाच्या मुहूर्तावर ध्वजारोहण झाले. या सोहळ्यास संगरी पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य विदू शेखर भारती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व दहा आखाड्याचे प्रमुख महंत साधुमंत आणि मान्यवर उपस्थित होते.Nashik Kumbh Mela flag hoisting by the Nabhik Samaj

Nashik Kumbh Mela flag hoisting by the Nabhik Samaj 4

नाभिक समाजातील मोरे कुटुंब

त्र्यंबकेश्वर नगरीतील नाभिक समाजातील मोरे कुटुंबाकडे कुशावर्त तीर्थावरील धर्म ध्वजारोहणाचा मान पूर्वापार चालत आला आहे. या परंपरेनुसार नाभिक वतनदार संघाचे गणेश मोरे आणि निलेश मोरे यांना यंदाच्या सोहळ्यासाठी नियोजन समितीकडून अधिकृत प्रवेशिका देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सकाळी दहा पासूनच हे दोघे कुशावर्त तीर्थावरील धर्म ध्वजा समोरील छतावर उपस्थित होते. संपूर्ण धार्मिक विधी आणि पूजा विधी पार पडेपर्यंत त्यांनी निर्धारित ठिकाणी थांबून ध्वजारोहणाच्या क्षणाची प्रतीक्षा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजाविधी झाल्यानंतर मंत्रोच्चार आणि शंख नादाने परिसर दुमदुमून उठला. त्यानंतर ध्वजारोहणासाठी मानकरी म्हणून गणेश मोरे आणि निलेश मोरे पुढे आले. ध्वजाला जोडलेली दोरी दोघांच्या हाती देण्यात आली आणि त्यांनी ती खेचताच धर्म ध्वज डोलाने उंचावला.Nashik Kumbh Mela flag hoisting by the Nabhik Samaj

Nashik Kumbh Mela flag hoisting by the Nabhik Samaj 5

सनई चौघड्याचा मान नाभिक समाजाकडे

नाशिक त्रंबकेश्वर येथे दर बारा वर्षांनी साजरा होणाऱ्या कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचा मान ज्या पद्धतीने नाभिक समाजाकडे आहे. त्याच पद्धतीने ध्वजारोहणाची आदल्या दिवशी संपूर्ण नगरीत नगर प्रदक्षिणा म्हणून मिरवणूक काढली जाते. हा ध्वज एका रथामध्ये ठेवून त्याची नगर प्रदक्षिणा काढली जाते. या नगर प्रदक्षणामध्ये सनई चौघडा वाजवण्याचा मान हा नाभिक समाजाकडे आहे. तो मान परंपरेने नाभिक समाजाकडे आहे. यावर्षी पण ध्वजारोहणाच्या आदल्या दिवशी ध्वजाची मिरवणूक काढण्यात आली होती. तेव्हा त्या मिरवणुकीत नाशिक जिल्ह्यातील सर्व नाभिक समाज बांधव उपस्थित होते तसेच त्यांच्या हस्ते सनई चौघड्याचे मंगल वाद्य वाजवण्यात आले होते.Nashik Kumbh Mela flag hoisting by the Nabhik Samaj

धर्म ध्वज ग्राम परिक्रमा मिरवणूकीत नाभिक समाज

उद्या दि ३१ रोजी कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण समारंभ होणार आहे त्या अगोदर नाशिक शहरातून नगर प्रदक्षिणा झाली त्यात श्री गंगा गोदावरी नाभिक (वतनदार) संस्थेचा रथ अग्रक्रमाने मिरवणुकीत पुढे होता माननीय श्री भास्करराव शेजवळ , कैलास गोविंदराव सोनावणे आणि सहकारी सनई चौघडे वादन करीत रथात होते.Nashik Kumbh Mela flag hoisting by the Nabhik Samaj
या वेळी नाभिक महामंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री संजयजी गायकवाड आणि कैलासभाऊ शिंदे ,नंदू भाऊ जाधव ,अविनाशजी लोखंडे , हरीश सोनवणे, विशाल बोरसे, विनायक बोरसे, गोपाळ बोरसे व सर्व कार्यकर्ते मिरवणुकीत सामील झाले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top