महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एस.टी.महामंडळ होय.याच एस.टी.ला “लालपरी” म्हणून ही संबोधले जाते.हि लालपरी गोरगरीबांची आणि मध्यम वर्गाची “जीवनदायनी” आहे.
याच एस.टी.महामंडळाच्या वतीने समाजातील विविध घटकांसाठी तब्बल 43 योजना राबविल्या जातात. त्या योजना कोणत्या आहेत.आणि कोणासाठी आहेत.या बद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.43 schemes of ST Corporation?
43 schemes of ST Corporation?
शालेय विद्यार्थ्यां पासून ते 75 वर्षां च्या नागरिकांना एस टी महामंडळाच्या वतीने एकूण 43 योजना राबविल्या जातात.यात काहिंना 100% सुट तर काहींना 30% सुट दिली जाते.
याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.प्रथम 100% मोफत प्रवास कोणाला आहे तो पाहु.43 schemes of ST Corporation?
एस. टी.त 100% मोफत प्रवास
- स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे साथीदार यांना महाराष्ट्रात 100% मोफत प्रवास असतो.
- शहीद जवानांच्या वीरपत्नीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात 100% मोफत प्रवास असतो.
- अहिल्याबाई होळकर योजना – या योजनेच्या माध्यमातून इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत शिक्षण घेनार्या विद्यार्थीनी (मुली) यांना 100% मोफत प्रवास असतो.
- सिकलसेल आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना एस टी मध्ये 100% मोफत प्रवास असतो.
- एच.आय.व्ही बाधीत म्हणजे एड्स आजार असलेल्या रुग्णांना एस टी मध्ये 100% मोफत प्रवास असतो.
- डायलिसिस वरील रुग्णांना एस टी मध्ये 100% मोफत प्रवास असतो.
- हिमोफिलीया या आजारांच्या रुग्णांना एस टी मध्ये 100% मोफत प्रवास असतो.
- अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि छायाचित्रकार हे लोकशाहीचा तिसरा स्तंभ आणि त्यांना एस टी महामंडळाच्या प्रवासात 100% मोफत प्रवास असतो.
- ज्या व्यक्तींना डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.आशा व्यक्तींना एस टी महामंडळाच्या गाडीमध्ये 100% प्रवास मोफत असतो.
- आदिवासी सेवक पुरस्कार्थी यांना पण एस टी महामंडळाच्या प्रवासात 100% मोफत प्रवास असतो.
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार्थी यांना पण एस टी महामंडळाच्या प्रवासात 100% प्रवास मोफत असतो.
- पुरस्काराने सन्मानित खेळाडूंना एस टी महामंडळाच्या प्रवासात 100% मोफत प्रवास असतो.यामध्ये
- अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे साथीदार यांना पण एस टी प्रवासात 100% मोफत प्रवास असतो.
- राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त व्यक्तींना एस टी प्रवासात 100% मोफत प्रवास असतो.
- आजी – माजी विधान मंडळ सदस्य व साथीदार यांना एस टी महामंडळाच्या प्रवासात 100% मोफत प्रवास असतो.
- पंढरपूरात आषाढी, कार्तिकी वारीत महापुजेसाठी मान मिळालेल्या दाम्पत्याला एस टी प्रवासात 100% मोफत प्रवास असतो.
- अमृत जेष्ठ नागरिक 75 वर्षांवरील नागरीकांना महाराष्ट्रात 100% मोफत प्रवास असतो.
आशा पद्धतीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने 17 प्रकारच्या व्यक्तींना एस टी मध्ये मोफत प्रवास असतो.43 schemes of ST Corporation?
एस टी त 75% मोफत प्रवास
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने खालील व्यक्तींना एस टी प्रवासात 75% सवलत दिली आहे.ते पुढील प्रमाणे आहेत.43 schemes of ST Corporation?
- क्षयरोगी
- कृष्टरोगी
- कर्करोगी
- अंधव्यक्ती (साधी बस)
- अपंग व्यक्ती (साधी बस)
एसटी प्रवास 70 टक्के सवलत
- अपंग व्यक्ती (शिवशाही बस)
- अंध व्यक्ती (शिवशाही बस)
या व्यक्तींना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीमध्ये 70 टक्के मोफत प्रवासाची सोय असते.43 schemes of ST Corporation?
एसटी प्रवासात 66.67% सवलत यांना
- विद्यार्थी पास शैक्षणिक(प्राथमिक /माध्यमिक उच्च/ माध्यमिक /महाविद्यालयीन)
- विद्यार्थी मासिक पास यात्रिक शिक्षण/ व्यावसायिक शिक्षण/ प्राथमिक /माध्यम/ उच्च माध्य /महाविद्यालयीन
- कौशल्य सेतु अभियान अंतर्गत विद्यार्थी (06 महिने पर्यंत)
- मुंबई पुनर्वसन केंद्र मानसिक दृष्टया अपंग असलेल्या विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी
- ६६.६७% सवलत मिळते.
एसटी ५०% सवलत यांना
१) मोठ्या सुट्टीत घरी जाने येण्यासाठी (प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक/ महाविद्यालयीन)
२) परीक्षेला जाणे येण्यासाठी (प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक/ महाविद्यालयीन)
३) आजारी आई वडील भेटायला जाणे जाणे येणे साठी (प्राथमिक/ माध्यमिक इल्स माध्यमिक /महाविद्यालयीन)
४) कॅम्प ला जाणे येण्यासाठी (प्राथमिक/ माध्यमिक/ महाविद्यालयीन)
५) शैक्षणिक सहलीसाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेले प्रसंगी करार ((प्राथमिक/ माध्यमिक/उच्च माध्यमिक/महाविद्यालयीन)
६) शैक्षणिक स्पर्धेत सहभागी विद्यार्थी
७) महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ व्यक्ती ज्यांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे अशांना 50 टक्के सवलत मिळते (साधी बस)
८)अंध व्यक्ती चे साथीदार (65% अंधत्व असलेले साथीदार)साधी बस.
९) अपंग व्यक्तीचे साथीदार (65% अपंगत्व असलेल्या साथीदारांना) साधी बस
वरील व्यक्तींना एसटीमध्ये पन्नास टक्के सवलत दिली जाते
एस टी त 45% सवलत यांना
१) महाराष्ट्र राज्यातील अशा व्यक्ती ज्यांचे वय 65 वर्षे पूर्ण झाले आहे अशा व्यक्तींना शिवशाहीमध्ये 45 टक्के सवलत देण्यात येते
२) अंध व्यक्तीचे साथीदार ज्यांना 65 टक्के अंधत्व प्राप्त आहे अशांना शिवशाही बस मध्ये प्रवासासाठी पंचेचाळीस टक्के दिली जाते.
३) अपंग व्यक्तीचे साथीदार ज्यांना 65 टक्के अपंगत्व प्राप्त झाले आहे अशा व्यक्तींना शिवशाहीमध्ये 45 टक्के सवलत दिली जाते
एस टी त 33.33% सवलत यांना
राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या खेळात भाग घेनारे विजेते स्पर्धकासाठी एस टी मध्ये 33.33% प्रवासात सवलत दिली जाते.43 schemes of ST Corporation?
एस टी त 30% सवलत यांना
महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना ज्यांचे वय 66 वर्षे पूर्ण झाले आहे व त्यांना शिवशाहीमध्ये “शयनयान” पाहिजे अशा व्यक्तींना 30 टक्के सवलत दिली जाते
वरील प्रमाणे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने एसटीमध्ये सवलती दिल्या जातात43 schemes of ST Corporation?