महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या सन 2023 च्या शिष्यवृत्ती परीक्षेत नाभिक समाजाची “कार्तिकी सोमनाथ साळुंखे” हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक तर राज्यामध्ये सहावा क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.Scholarship exam result 2023.
Scholarship exam result 2013
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रोत्साहन मिळावे व भविष्यात त्यांची प्रगती व्हावी म्हणून इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांची “शिष्यवृत्ती परीक्षा” घेतली जाते. या परीक्षेत गुणवत्ता यादीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनातर्फे विशिष्ट रक्कम (शिष्यवृत्ती )देऊन प्रमाणपत्र दिले जाते.Scholarship exam result 2023.
जेणेकरून त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे व स्पर्धा परीक्षेचे ज्ञान व्हावे. हा या परीक्षे मागचा उद्देश असतो.Scholarship exam result 2023.
कार्तिकी साळुंखे जिल्हात प्रथम
सन 2023 मध्ये घेण्यात आलेल्या “शिष्यवृत्ती परीक्षेचा” निकाल नुकताच जाहीर झाला असून यात सांगली जिल्ह्यातील, तासगाव तालुक्यातील, कवठे एंकद येथे जिल्हा परिषद शाळेत. इयत्ता आठवीत शिकणारी कु.कार्तिकी सोमनाथ साळुंखे. हिने इयत्ता आठवीत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत 92.66% गुण प्राप्त करून “सांगली जिल्ह्यात प्रथम” क्रमांक पटकावला.
तर “महाराष्ट्र राज्यात सहावा” क्रमांक पटकावला आहे.त्यामुळे तीचा जिल्हा परिषद शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.तसेच सर्वांकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.Scholarship exam result 2023.
जिल्हा परिषद शाळेत शिक्षण
कुमारी कार्तिकी सोमनाथ साळुंखे हि विद्यार्थीनी तासगाव तालुक्यातील कवठे एंकद येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत आहे.याच शाळेच्या माध्यमातून कार्तिकी साळुंखे इयत्ता आठवीत असताना शिष्यवृत्ती परीक्षेला बसली होती.कार्तिकी साळुंखे हिने शिष्यवृत्ती परीक्षेत 92.66% गुण प्राप्त करून सांगली जिल्ह्यात प्रथम क्रमांक तर राज्यामध्ये सहावा क्रमांक पटकावला आहे.Scholarship exam result 2023.
वर्षाला 7500 हजार रुपये मिळनार
कुमारी कार्तिकी सोमनाथ सोळंके हिने इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जे यश संपादन केले आहे. त्याबद्दल तिला “महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद- पुणे” यांच्यामार्फत “प्रमाणपत्र” व शिष्यवृत्तीची रक्कम म्हणून (सुधारीत शासन आदेशानुसार) वर्षाला “7500 रुपये शिष्यवृत्ती” पुढील दोन वर्षासाठी मिळणार आहे. ही शिष्यवृत्ती तिच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट शासनाच्या वतीने जमा केली जाते.
पालकांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत बसवावे
कु.कार्तिकी साळुंखे हिचे वडिल सोमनाथ साळुंखे हे नाभिक संघटनेचे सक्रिय पदाधिकारी असून वंचित बहुजन आघाडी पक्षात प्रदेश उपाध्यक्ष पदावर असून त्यांनी पालकांना आव्हान केले आहे की, “पालकांनी आपल्या मुलांना शासनाच्या वतीने घेण्यात येणार्या विविध परीक्षेत बसवावे”.आपल्या मुलांच्या कलागुणांना वाव द्यावा.
यातुन त्यांना कोणत्या क्षेत्रात आवड आहे हे लक्षात येते.पुढे त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करू द्यावे.Scholarship exam result 2023.