जिवाजी महाले जन्मगावी होणार भव्य पुतळा || the birthplace of Jiwaji Mahale will be statue

the birthplace of Jiwaji Mahale will be statue 8

प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवुन इतिहासात “होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी” या महनीने अजरामर झालेले जिवाजी महाले यांचा भव्य पुतळा त्यांच्या जन्म गावी वाई जवळील कोंडवली गावात लवकरच अनावरण होणार असून जिवाजी महाले यांचा पुतळा तयार झाला आहे.the birthplace of Jiwaji Mahale will be statue

the birthplace of Jiwaji Mahale will be statue

जिवाजी महाले यांच्या जन्मगावी पुतळ्याचे अनावरण लवकरच होणार असून जिवाजी महाले यांचा पुतळा तयार झाला असून त्याचे अनावरण पण लवकरच होणार आहे या बद्दल अधिक माहिती शिवसेना प्रवक्ते -किरण सोनवणे यांनी पुढीलप्रमाणे दिली

the birthplace of Jiwaji Mahale will be statue 2

“होता जिवा म्हणून वाचला शिवा”

आज मी (किरण सोनवणे)“छ्त्रपती शिवाजी महाराज” यांचे अंगरक्षक “शिवरत्न जिवाजी महाले” यांच्या वाई जवळील कोंढवली गावात त्यांच्या जयंती निमित्त (9 आक्टोंबर) प्रमुख पाहुणा म्हणून दाखल झालो आहे.

the birthplace of Jiwaji Mahale will be statue 3
शिवसेना पक्षामुळे (शिंदे गट) ही संधी मला मिळाली आहे . “शिवरत्न जिवाजी महाले” यांचा पूर्णाकृती पुतळा प्रथमच त्यांच्या गावी घेवून येण्याचा आणि असा पुतळा बनवा, यामागे माझे प्रयत्न आहेत.the birthplace of Jiwaji Mahale will be statue

श्रीकांत शिंदे प्रतिष्ठानने बनवला पुतळा

त्याला मा. माननीय “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे” यांनी समर्थन दिले तर शिवसेना नेते खासदार डॉ श्रीकांत शिंदे प्रतिष्ठानने हा पुतळा बनवण्यात पुढाकार घेतला आणि माझे मित्र जागतिक कीर्तीचे शिल्पकार किशोर कदम यांनी अतिशय सुंदर असा पुतळा बनवला आहे, की हा पुतळा बघून प्रत्येक शिवप्रेमींनी आपल्या घरात हा पुतळा असावा अशी इच्छा झाल्या शिवाय राहणार नाही . हे जिवाजी महाले यांचे प्रेरणा चित्र आहे.

the birthplace of Jiwaji Mahale will be statue 4

प्रतापगडावर पुतळ्यासाठी संघर्ष

शिवरत्न जिवाजी महाले यांचा पुतळा प्रतापगडावर व्हावा यासाठी गेली २० वर्ष अनेक संघटना झगडत आहेत. ही माहिती माझे मित्र आणि महाराष्ट्रातील शिक्षकांचे नेते अनिलजी बोरनारे यांनी दिली . तेंव्हा मला शॉक बसला . शिवरायांचे हिंदवी स्वराज्य उभारण्यात ज्या मावळ्याचा सिंहाचा वाटा होता त्या अश्या शूर , त्यागी , शिव समर्पित मावळ्या पैकी जिवाजी महाले मावळ्याच्या पुतळ्यासाठी २० वर्ष वाट पहावी लागणे हे महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला लांच्छनास्पद आहे .the birthplace of Jiwaji Mahale will be statue

the birthplace of Jiwaji Mahale will be statue 5

पुतळ्यासाठी मुंबईत बैठक

मी (किरण सोनवणे) ही गोष्ट शिवसेना नेते डॉ श्रीकांत शिंदे यांच्या कानावर घातली, त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली आणि लगेचच मुंबई मध्ये बैठक बोलावली. त्यात गोविंदराव पिंपळ गावकर , निनाद टावरे, मनोज कोरडे , अनिल बोरनारे, आणि त्यांचे सहकारी मुंबई मध्ये आले, चर्चा झाली , त्यानंतर मी सातारा येथे जिल्हाधिकारी यांना भेटण्यासाठी येवून गेलो.the birthplace of Jiwaji Mahale will be statue

the birthplace of Jiwaji Mahale will be statue 6

आज शिवसृष्टीत जिवाजी महाले यांचा पुतळा बसवण्याची ऑर्डर आमच्या कडे आहे . हा कार्यक्रम प्रतापगडाच्या पायथ्याला होणार होता मात्र वेळ कमी आणि मी संघटनेकडे कार्यक्रमाला कमीत कमी एक लाख लोक येतील का म्हणून विचारले . पण वेळ कमी म्हणून ते शक्य नाही असे समजले . मग हा कार्यक्रम जीवाजींच्या जन्मगावी होतो आहे , सोबत पूर्णाकृती पुतळा आहे . या ऐतिहासिक कार्यक्रमाला मला उपस्थित राहुन इतिहासाचा भाग होता आले मी स्वतःला भाग्यवान समजतो

किरण सोनावणे
प्रवक्ता – शिवसेना (महाराष्ट्र )

कोंडवली येथे जिवाजी महाले जयंती मोठ्या उत्साहात साजरी

कोंढवली/ वाई/सातारा –
९ ऑक्टोबर २०२४ रोजी छत्रपती शिवरायांचे अत्यंत विश्वासू अंगरक्षक शिवरत्न वीर जिवाजी महाले यांचा ३८९ वा. जयंती सोहळा शिवरायांचे अंगरक्षक वीर जिवाजी महाले स्मारक समिती कोंढवली,वीर जिवा महाले नाभिक संघटना नाभिक समाज,वाई आणि अखिल भारतीय जीवा सेना, शिवप्रेमी व सकल नाभिक समाज यांच्या आयोजनातून वीर जिवाजी महाले यांचे जन्मगाव कोंढवली ता.वाई जि सातारा येथे साजरा करण्यात आला.

the birthplace of Jiwaji Mahale will be statue 7

सदर कार्यक्रमास वीर जिवाजी महाले यांच्या थेट तेराव्या वंशज सुमनताई सपकाळ महाले,शिवसेना प्रवक्ता किरण सोनवणे तसेच मूर्ति शिल्पकार किशोर कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली.the birthplace of Jiwaji Mahale will be statue
सदर कार्यक्रमाची सुरुवात वीर जिवाजी महाले यांच्या जुन्या वाड्यापासून ज्योत पेटवून करण्यात आली व स्मारक स्थळी प्रस्थान केल्यानंतर मान्यवरांचे स्वागत राजेंद्र चोरट यांनी केले.मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन झालेनंतर शाहीर खंडजोडे यांचा अंगावर शहारे आणणारा पोवाडा सादर झाला.                        कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे किरण सोनवणे,विकास आण्णा शिंदे, किशोर कदम,अनिल बोरणारे, वीर जीवा महाले स्मारक समिती प्रतापगड चे अशासकीय सदस्य – निनादजी तावरे,अखिल भारतीय जिवा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद पिंपळगावकर,राष्ट्रीय कार्याध्यक्ष राजकुमार गाजरे,साहेबराव शेळके,सुरेश बोर्डे,नवनाथ घोडके,मुंजाभाऊ भाले,रामेश्वर सवणे,भाऊसाहेब नाईक,नारायण वरपे,लक्ष्मण महिपाल,दिपक गुजरे,दत्ता राऊत,सलून ब्युटीपार्लर कामगार युनियनचे प्रकाश चव्हाण.the birthplace of Jiwaji Mahale will be statue

तसेच वीर जीवा महाले नाभिक संघटना नाभिक समाज चे संस्थापक अशोक सूर्यवंशी, अध्यक्ष- उमेश (महेश) जाधव ,शंकर मर्दाने,रविंद्र जगदाळे,शंकर मर्दाने,सोमनाथ काळे, यांनी आपले मनोगते व्यक्त केले.
यावेळी स्मारक समिती व नाभिक संघटनेने कोंढवली येथे लवकरच शासनाचे माध्यमातून भव्य स्मारक उभारले जाईल.त्याबाबत कामकाज चालू आहे.असे सांगितले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाराम शिंदे यांनी केले.रविंद्र जगदाळे यांनी ऐतिहासिक दांडपट्याचा खेळ सादर करित दांडपट्याचे महत्व लोकांना पटवून दिले.वीर जिवाजी महाले यांचे पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करण्यात आले. सदर पूजनासाठी पूर्णाकृती पुतळा श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांचे वतीने स्मारक समिती व कोंडवली ग्रामस्थ यांस भेट देण्यात आला.the birthplace of Jiwaji Mahale will be statue

वीर जिवाजी महाले यांचे जन्मगाव कोंढवली येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी वीर जीवा महाले नाभिक संघटना नाभिक समाज व म.ना.महामंडळचे उपजिल्हाध्यक्ष रमेश जाधव,तालुका अध्यक्ष संपतराव सूर्यवंशी,रवि क्षिरसागर पदाधिकारी जितेंद्र पवार, सुरेश जाधव,विवेक तावरे,सचिन तावरे,दिगंबर सुर्यवंशी,अमोल राऊत,सुनिल तावरे,विकास सुर्यवंशी,विजय सपकाळ, दिपक सुर्यवंशी,शंभू सुर्यवंशी,नाना सुर्यवंशी, सागर सुर्यवंशी,प्रकाश तावरे,विजय पप्पू सुर्यवंशी ,दिपक जाधव,योगेश सुर्यवंशी,उमेश सुर्यवंशी,विजय तावरे,प्रदिप सुर्यवंशी,

छोटु सुर्यवंशी,राजेंद्र सुर्यवंशी,कुणाल तावरे,सोपान तावरे,विशाल तावरे ,ज्ञानेश्वर जाधव,अमित सुर्यवंशी,सुधाकर तावरे,लक्ष्मण पवार,चंद्रकांत ह. सुर्यवंशी,संजय पवार,हेमंत साळुंखे,अमोल सुर्यवंशी ,सोमनाथ तावरे,राजेंद्र काकडे,अशोक सुर्यवंशी,कमलाकर तावरे,सचिन कदम,संजय सपकाळ,अनिल पवार, दत्तात्रय सुर्यवंशी,सचिन सपकाळ,हृषीकेश कदम,प्रविण गायकवाड,नितीन साळुंखे विकी पवार,सागर प्र तावरे,
गणपत चोरट, राजाराम चोरट, राजेंद्र चोरट, आनंदा कदम, बाबूजी चोरट,रमेश बेलोसे, दत्तात्रय चोरट, मोतीराम ओंबळे, कृष्णदेव कळंबे,सौ.जगताप सरपंच कोढवली, उमेश कदम,श्री जंगम तसेच वीर जिवाजी महाले यांचे पुतळ्यास वंदन करण्यास महाराष्ट्रातील नाभिक समाज, कोंढवली ग्रामस्थ, तमाम शिवप्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.the birthplace of Jiwaji Mahale will be statue 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top